पालघरमध्ये कोरोनाचा विस्फोट; आज दिवसभरात 265 रुग्णांची नोंद, चार जणांचा मृत्यू

आज दिवसभरामध्ये जिल्ह्यात 265 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

पालघर | जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. आज दिवसभरामध्ये जिल्ह्यात 265 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर याच कालावधीत 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज नव्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 88 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता 14 हजार 816 वर पोहचला असून आजवर 288 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 4 हजार 447 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून 10 हजार 081 रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies