Corona Updates; नवी मुंबईत दिवसभरात 58 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

नवी मुंबईत आज दिवसभरात 58 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

नवी मुंबई | नवी मुंबईत आज दिवसभरात 58 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळं कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 548 वर पोहचली आहे. सदरील रुग्णांमध्ये बेलापूरमधील 4 रुग्ण, नेरुळ 14 रुग्ण, वाशी 4 रुग्ण, तुर्भे 5 रुग्ण, कोपेरखेरने 13 रुग्ण, घणसोली 5 रुग्ण, ऐरोली 9 रुग्ण, आणि दिघा येथील चार रुग्णांचा समावेश आहे. तर आज दिवसभरात दोन जणांचा कोरोनानं बळी घेतला असल्यानं कोरोनापासून मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचा आकडा 47 वर पोहचला आहे. तसेच आज दिवसभरात 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं मोठी चिंता निर्माण झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहावं कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies