पनवेलमध्ये आज दिवसभरात 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

आज एका महिलेचा मृत्यूही झाला आहे.

पनवेल | आज पनवेलमध्ये आज 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. आढळून आलेल्या या रुग्णांमध्ये कामोठेमधील 6 रुग्ण, खारघरमधील 2 रुग्ण, कळंबोलीतील 1 रुग्ण, पनवेलमधील 4 रुग्ण, आणि एक रुग्ण रोडपालीमधील आहे. यामध्ये नर्स, पोलीस कर्मचारी, नवी मुंबईतील परिवहन सेवेतील ड्राईव्हर यांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे. तर आज एका कोरोना ग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज आढळून आलेल्या या रुग्णांमुळं पनवेलमधील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 332 झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies