खडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

खडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

ठाणे । खाडीतून काढलेली अवैध रेती आणि खडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणारे कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. एकूण दहा जणांच्या टोळीला अटक करण्यात यश आले असून त्यांच्याकडून 1 कोटी 28 लाख रुपयांच्या गौण खनीज परवाना पावत्या जप्त करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. बनावट रॉयल्टी रिसिट छापून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला जात असल्याची खबर ठाणे गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यांनी शिताफीने या दहा जणांना अटक केली. विकी माळी, अब्दुल खान, पद्माकर राणे, शाजी पुनान, अरविंद पेवेकर, प्रशांत म्हात्रे, लकी सुतार, उमेश यादव, राजू पवार आणि रवी जैस्वाल अशी अटक झालेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 156 पावती पुस्तके, लॅपटॉप, मोबाईल व पेनड्राईव जप्त करण्यात आले असून हे टोळकं कळवा आणि भिवंडी भागातील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भिवंडी वसई खाडी जवळ आपले सावज हेरून फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळीची व्याप्ती केवढी होती आणि हे स्कॅम एकंदरीत केवढे मोठे आहे, याचा तपास पोलीस करत असून लवकरच सत्य बाहेर येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies