"जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है" जया बच्चन यांचा रवि किशनवर निशाणा

राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी कलाकार आणि भाजपचे खासदार रवी किशन यांच्यावर 'जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं' म्हणत निशाणा साधला आहे

नवी दिल्ली । संसदेचं यंदाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून आता आरोप-प्रत्योरोप सुरू झाले आहे. समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत नाव न घेता रवि किशनवर हल्लाबोल केला आहे. "ड्रग्सच्या मुद्द्यावरून बॉलिवुड इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं षडयंत्र केला जात आहे" अशी टिका त्यांनी केली. बच्चन म्हणाल्या की, सोमवारी लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडवर भाष्य केले. त्यांना मी सांगू इच्छिते की, "जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है. ये गलत बात है." अशी नाव न घेता टिका जया बच्चन यांनी रवि किशनवर केली.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरून एनसीबीने रिया तसेच तिचा भाऊ शौविकला अटक केली आहे. रिया ड्रग्स प्रकरणी सारा अली खान, रकुलप्रित सिंह यांच्या बरोबर आणखी 25 बॉलिवुड कलाकांराचे नाव सांगितले आहे. त्यामुळे बॉलिवुड क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा तपास एनसीबी करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies