महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, कोरोनाचे 124 रुग्ण

या रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक 51 तर पुण्यामधील 19 रुग्णांचा समावेश आहे.

मुंबई | महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता राज्यातील रुग्णांचा आकडा 124 वर गेला आहे. बुधवारी मुंबईमध्ये 10 आणि सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील 5 रुग्ण आढळले. आजही काही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आता कोरोनाग्रस्तांची संख्या 124 वर आहे.

या रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक 51 तर पुण्यामधील 19 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 12 आणि सांगलीत 9 रुग्ण आढळलेले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागामध्येही कोरोनैाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे आहे. लोकांनी गर्दी करू नये आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर उतरत आहे. पोलीस अशा लोकांविरुद्ध कारवाई करताना दिसत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies