मोदी सरकारनेच सेलिब्रिटींना 'ट्विट' करण्यासाठी भाग पाडले; ठाकरे सरकारने दिले चौकशीचे आदेश

कृषी कायद्यावर अनेक सेलिब्रिटींनी ट्विट केले होते. त्यावर आता चौकशी करा अशी मागणी काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केली आहे.

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट केले आणि त्यानंतर देशभराचत ट्विटर युद्ध पाहायला मिळालं. रेहानाच्या ट्विटनंतर खेळाडू, बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत, भारताला विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका. असे आवाहन केले होते. त्यावेळी अनेकांचे हे ट्विट सारखेच असल्याने अनेकांनी या ट्विटबद्दल शंका व्यक्त केली होती. यावर विरोधकही चांगले तापले असून, मोदी सरकार या कलाकारांवर दबाब टाकत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या सगळ्या पार्श्वभुमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कलाकारांनी केलेल्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.

कलाकारांवर दबाब टाकण्यात आला असून, त्यांना ट्विट करण्यासाठी भाजपने भाग पाडले असा आरोप काँग्रेसने केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यासर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल हिचा ट्विट सारखाच होता. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. ‘कोणीही व्यक्तिगत पातळीवर मत व्यक्त करत असेल तर त्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण ट्विटची वेळ आणि भाषा पाहिली तर हे भाजपाच्या स्क्रिप्टनुसार करण्यात आलं का? याबाबत शंका निर्माण होते. अक्षय आणि सायना नेहवाल यांच्या ट्विटरमध्ये मजकूर सारखाच होता.' त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies