पनवेल महानगरपालिका कार्यालयावर शिक्षकसंघाचा मोर्चा

शिक्षण विभागात दडपशाही व दहशत निर्माण केली असा आरोप या शिक्षण संघटनांनी केला

पनवेल । आज पनवेल महापालिका उपायुक्त यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध मोर्चा काढण्यात आला होता. पनवेल महापालिकेच्या एका शिक्षण विभागात उपशिक्षिका म्हणून काम करण्याऱ्या एका शिक्षिकेने पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर व पिचड यांच्याकडून होणाऱ्या मानसिक व छळवणूक प्रकरणी संबंधित विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. मात्र, संबंधित महिलेने तक्रार अर्ज सादर केल्यानंतर सदर प्रकरण दडपण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लेंगरेकर यांनी मनपा शिक्षण विभागात दडपशाही व दहशत निर्माण केली असा आरोप या शिक्षण संघटनांनी केला.

या बाबतीत पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी ही या गोष्टीची तात्काळ दखल घेत या गोष्टीची महासभेत प्रस्ताव आणून उपायुक्त यांना सक्तीच्या रजेवर पाटवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. जमीर लेंगरेकर सारखे वर्ग 1 अधिकारी यांचे महिलांप्रतीचा दृष्टिकोन वर्तन हे बरोबर नसल्याचे महिलांनी सांगितले आहे. यामुळे लेंगरेकर यांची तात्काळ इतरत्र बदली करण्यास शिफारस करण्यात यावी व त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी पनवेल महानगरपालिका सोडून पनवेल परिसरातील शासकिय कार्यालयातील वर्ग 1 असलेल्या महिला अधिकारी यांचा समावेश विशाखा समितीत करून ज्या महिलांचे शोषण झाले आहे त्यांची चौकशी करावी. तेव्हा पर्यंत लेंगरेकर व पिचड यांना सक्तिच्या रजेवर पाठवावे अशी मागणी या महिलांनी केली आहे.

या बाबतीत तक्रार अर्ज प्राप्त झाला असून त्या वर महिला तक्रार निवारण समिती / विशाखा समिती पुनर्गठित केली असून यामध्ये वर्ग 1 दर्जाच्या महिला अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तक्रारदार यांच्या अर्जानुसार आम्ही विशाखा समितीमध्ये बदल केला असून त्यात चौकशी होईल व त्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या बाबत पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ऑन कॅमेरा न बोलता त्यांचा वरील सर्व आरोप फेटाळत शिक्षण विभागातील भ्रष्ट्राचार बाहेर काढल्यामुळे या सर्व लोकांनी एकत्र येत हे षड्यंत्र माझ्या विरुद्ध रचले आहे.योग्य वेळी कागदोपत्री पुरावे मी सादर करेन. शिक्षण विभागाच्या अंतर्गत बदल्या या शासनाच्या नियमानुसारच केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies