शशी थरूर आणि राजदीप सरदेसाई यांच्यासह अन्य पत्रकारांच्या अटकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

दिल्ली हिंसाचार प्रकरणी खोटी माहिती पसरवण्यावरून शशी थरूर यांच्यासह आणखी सहा पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नवी दिल्ली । प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी शरूर आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह अन्य पत्रकारांच्या अटकेला आज स्थगिती दिली आहे. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. त्यात एका आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यावर ट्विट करण्याच्या आरोपावरून लोकसभा खासदार शशी थरूरसह आणखी सहा पत्रकारांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. गुडगाव, बंगळूरू आणि नोएडात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात देशद्रोह, धमकी, सार्वजनिक शांततेला भंग करने, धार्मिक तेढ निर्माण करणं असे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारचे वकील चिंरजीव कुमार यांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराबद्दल याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत त्यांनी 26 जानेवारी रोजी हिंसाचारात नवरीत सिंह या आंदोलकाचं मृत्यू झाला होता. त्यात अनेक पत्रकारांनी खोटी माहिती टिव्हीवर चालवली. असे याचिकेत कुमार यांनी म्हटले होते. मात्र आज सुप्रीम कोर्टाने त्यांच्या या याचिकेवर सुनावणी केली असून, त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies