पराजयाचा भीतीने विनोद घोसाळकरांचे मानसिक संतुलन बिघडल - सुनील तटकरे

छत्रपती शिवरायांच नाव घेणारी माणस छत्रपतींना अभिप्रेत असलेल कधी वागले नाहीत

रायगड । पराजयाचा भीतीने विनोद घोसाळकरांचे मानसिक संतुलन बिघडलं. दोन वेळा माझ्या विरोधात त्यांचा पराजय झाला. तिसऱ्यांदाही 1000% होईल. विनोद घोसाळकरांनी पुऩ्हा एकदा जाहिर आरोप करावेत, त्यांना त्यानंतर कारवाईला सामोर जावं लागेल. सरकार त्यांच होत त्यांनी आरोप सिद्ध करुन दाखवावेत असं वक्तव्य खासदार सुनील तटकरेंनी केलं. तसेच पाच वर्षांपूर्वी ते का पराभूत झालेत. याच आत्मपरीक्षण त्यांनी करावं. छत्रपती शिवरायांचं नाव घेणारी माणस छत्रपतींना अभिप्रेत असलेल कधी वागले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वागण्याचा गौफ्यस्फोट मी योग्यवेळी नक्कीच करणार आहे. असा इशारा तटकरेंनी यावेळी विनोद घोसाळकरांना दिला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. श्रीवर्धनमधून त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र ऐन वेळी सेनेकडून मुंबई म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. रोहा नगरपालिका निवडणुकीतील अनुभव आणि मतदारसंघातील निष्क्रियता लक्षात घेऊन शिवसेना नेतृत्वाने अवधूत यांना उमेदवारी देणे टाळले आहे.AM News Developed by Kalavati Technologies