पनवेल | तळोजा एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

तळोजा एमआयडीसीतील दीप केम कंपनीला भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे

पनवेल | तळोजा एमआयडीसी परिसरात प्लॉट क्रमांक 95 येथे असलेल्या दीप केम कंपनीला भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. आज दुपारच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. संबंधित कंपनी ही केमिकल पासून पावडर बनवण्याची प्रक्रिया करणाऱ्या कंपनीमध्ये मोडली जात असून या आगीत डिस्टिलेशन प्लांट पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या आगीमुळे एमआयडीसी परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.AM News Developed by Kalavati Technologies