बेदम मारहाण करीत रोकड घेऊन लुटारू पसार, कल्याण मधील धक्कादायक घटना

सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांचा तपास सुरु

कल्याण । एका व्यक्तिला बेदम मारहाण करुन त्याच्याकडून तब्बल 4 लाख रुपये घेऊन लूटारू पसार झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पिडीत व्यक्ति रामललीत गुप्ता याना गंभीर दुखापत झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा राम ललीत गुप्ता यांना लूटारु मारहाण करीत होते. तेव्हा रस्त्यावरील लोक लूटारूंना पकडण्याऐवजी फोटो काढण्यात दंग होते. यातून लोकांची संवेदनशीलता संपुष्टात आली आहे हे उघड झाले आहे.

राम ललीत गुप्ता हे उल्हासनगर येथील एका ए. एस. ट्रेडींग या शोरुममध्ये व्यवस्थापनाचे काम करतात. रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दुकान बंद झाल्यावर दुकानामधील तब्बल 3 लाक 85 हजाराची रोकड घेऊन राम ललीत गुप्ता हे घराकडे निघाले. कल्याण पूर्वेतील चिंचापाडा परिसरातील रस्त्यावर काही तरुणांनी त्याना हटकले. त्यांना मारहाण सुरु केली. त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना काही उमगण्याआधीच त्यांच्या हातातील रोकड घेऊन लूटारु पसार झाले. लूटीच्या घटनेनंतर रस्त्यावरुन पळूत जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज कोळसेवाडी पोलिसांच्या हाती लागले आहेत. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies