धक्कादायक! राजस्थानात चंबल नदीत 50 प्रवाशांसहीत बोट उलटल्याने 11 जणांना मृत्यू; 3 जणांचा शोधकार्य सुरू

राजस्थान कोटातील चंबल नदीत अचानक बोट पलटल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे

कोटा । राजस्थानच्या कोटा येथील चंबल नदीमध्ये अचानक बोट पलटी झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 8 वाजता घडली. या बोटीत सुमारे 50 जण असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला असून 3 जणांचा शोधकार्य सुरू आहे. अचानक नाव पलटी झाल्याने काही जणांना पोहणे येत असल्याने त्यांनी जीव वाचवला आहे. बोटीद्वारे हे लोकं कमलेश्वर धाम या ठिकाणी जात होते. बोटीत 14 मोटारसायकली आणि 50 जणांचा समावेश होता. अचानक बोट पलटी झाल्याने आरडा-ओरड सुरू झाली. त्यादरम्यान नदीकाळच्या गावकऱ्यांनी धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात त्यात 11 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर 3 जणांचा शोधकार्य सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी घटनेमध्ये मृत पावलेल्यांच्या घराच्यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. या घटनेत पाण्यात बुडून मृत पावलेल्यांमध्ये वृद्ध, लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8 वाजेच्यासुमारास ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies