औरंगाबाद | औरंगाबाद शहरात शनिवारी बीड बायपास परिसरात चालणारे सेक्स रॅकेट उघड झाले. यामध्ये राजेश नगर येथे राहणारे संजय कापसे आणि एक महिला परराज्यातील महिलांना डांबून सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. शनिवारी औरंगाबाद गुन्हे शाखेने सदर कुंटणखान्यावर धाड टाकत तीन महिला आणि चार ग्राहकांना पकडले.
अजय सुभाष साळवे वय 23, ज्ञानेश्वर सर्जेराव जराड वय 42, मोहम्मद साजिद अली वय 29 आणि अमोल दामू शेजुळ वय 29 यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याचबरोबर या ठिकाणाहून विदेशी मद्याचे 10 बॉक्स ज्यामध्ये 480 बॉटल ही सापडल्या आहेत. याची किंमत सुमारे एक लाख 44 हजार 930 आहे. कारवाई दरम्यान सापडलेल्या महिलांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. याबाबत पुंडलीक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.