मुंबईत तब्बल 53 कोटी रुपयांचे मैफिड्रीन ड्रग्स जप्त

याप्रकरणी एकूण 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून अधिक तपास एटीएसकडून सुरू आहे

मुंबई । गेल्या काही दिवसांत मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्स ची विक्री होत असल्याचे समोर आले होते. कॉलेज तरुण-तरुणी याला बळी पडत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार दहशतवादी विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई आणि विक्रोळी परिसरात छापेमारी करून तब्बल 53 करोड रुपयांचे मैफिड्रीन नावाचे ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणी एकूण 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून अधिक तपास एटीएसकडून सुरू आहे.

दहशतवादी विरोधी पथकाच्या विक्रोळी कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार मैफिड्रीन नावाचे अमली पदार्थ भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात आणणार असल्याचे समजले होते. त्यानुसार सापळा रचून एटीएसने दोघांना 9 किलो मैफिड्रीन सोबत अटक केली. तपासदरम्याम त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे मोठे रॅकेट असून यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याची माहिती मिळाली. या गुन्ह्यात एटीएसने आतापर्यंत अब्दुल रझाकी शेख (47), इरफान शेख (43), सुलेमान शेख (28), नरेश म्हसकर (44), जितेंद्र परमार्थ या आरोपींना अटक केलेली आहे.

एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने नवीबमुंबिया परिसरात एका फॅक्टरी मध्ये छापेमारी केली असता 129 किलो इतका मोठ्या प्रमाणात मेफीड्रीन ड्रग्सचा साठा सापडला. हे ड्रग्स तिथेच तयार केले जात असून ते वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करण्यात येणार होते. पोलिसांना त्याच फॅक्टरीमधून तब्बल 1 कोटी 40 लाख इतकी रोख रक्कम सुद्धा सापडली आहे. जप्त केलेल्या ड्रग्स ची एकूण किंमत जवळपास 53 करोड इतकी असल्याची मशीती एटीएसने दिली.

"मुंबई सध्या ड्रग्स तस्करीचे केंद्रस्थान बनत चालली असल्याची माहिती समोर आलीय. दिवसेंदिवस मुंबईतल्या वेगवेगक्या भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकले जात असल्याचे गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यातच आता नवी मुंबई आणि विक्रोळी परिसरातून हे ड्रग सापडले असल्याने यामागे मोठं रॅकेट आहे का याचा तपास एटीएस करत आहे.



AM News Developed by Kalavati Technologies