या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह कोसळणार परतीचा पाऊस

परतीचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला ओलेचिंब करणार आहे.

मुंबई | पावसाळा आता संपत आला आहे. दरम्यान परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. मंगळवारी मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस बरसला. ठाणे, डोंबिवली, भिवंडीत पावसाची जबरदस्त बॅटिंग सुरू होती. दरम्यान मराठवाड्यातही जोरदार पाऊस बरसला. डोंबिवलीमध्ये 4 तासांपेक्षा जास्त वेळ वीज पुरवठाही खंडीत झाला होता. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आता परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. बुधवार आणि गुरुवारनंतर राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

परतीचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला ओलेचिंब करणार आहे. हवामान खात्याकडून असा अंदाज वर्तवण्यात येणार आहे. खरंतर यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. यामुळे परतीच्या पावसानेही उशिर केला आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होईल. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बुधवारी महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे. 11 आणि 12 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तसेच 9 आणि 10 ऑक्टोबरला मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असेल. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies