रायगड | उरणमध्ये स्वॅब कलेक्शन केंद्राला मान्यता, रुग्णांना दिलासा

करंजा गावातील बाधितांची वाढती संख्या पाहता स्वॅब कलेक्शन सेंटर उरणमध्ये व्हावे ही उरणकरांची मागणी होती.

रायगड | उरणमध्ये स्वॅब कलेक्शन केंद्राला मान्यता मिळाल्याने येथील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. उरण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. संशयित रुग्णांना स्वॅब टेस्टिंगसाठी तालुक्याबाहेर जावे लागत होते.

करंजा गावातील बाधितांची वाढती संख्या पाहता स्वॅब कलेक्शन सेंटर उरणमध्ये व्हावे ही उरणकरांची मागणी होती. याला दुजोरा देत करंजा गावातील सचिन डाऊर यांनी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत हे केंद्र उरणमध्ये आणले होते मात्र या केंद्राला सुरू करण्यासाठी परवान्याची गरज होती. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णांची अडचण लक्षात घेत तात्काळ मान्यता दिल्याने, येथील केअर पॉईंट हॉस्पिटल येथे स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे आता येथील रुग्णांना उरणमध्येच ही सुविधा मिळणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies