महागाईने गाठला उच्चांक, कडधान्य, डाळींच्या किंमतीत वाढ

किरकोळ बाजारामध्येही कडधान्य 100 ते 120 रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे.

मुंबई | महंगाई डायन खाए जात है असे म्हणण्याची वेळ आता गृहिणींवर आली आहे. महागाईने प्रचंड वाढली आहे. एकतर यावर्षी पावसामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजरात मालाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे डाळींच्या किंमती प्रचंड महागणार आहे. याचा परिणाम सध्या बाजारात दिसून येतोय. दिवाळीनंतर बाजारात नवीन अन्नधान्याची आवक सुरू होत असते. मात्र यावेळी थोड्या उशिराने ही आवक सुरू झाली. डाळींच्या दरात गेल्या वर्षीच्या मानाने 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अनेक कडधान्य घाऊक बाजारात शंभर रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत. याचा परिणाम म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिळाला झळ बसत आहे. किरकोळ बाजारामध्येही कडधान्य 100 ते 120 रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. यापूर्वीच गेल्या आठ महिन्यांपासून कांदा, भाजीपाला यांच्या वाढलेल्या दराने त्रस्त झालेल्यांना आता या कडधान्याच्या वाढत्या दराचा सामना करावा लागणार आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी बाजारात तुरीच्या डाळींनी किलोमागे शंभरी पार केली होती. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करून रेशन दुकानात स्वस्त दरात डाळ उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र आताही तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्राहकांना महागड्या दरात डाळी आणि कडधान्य खरेदी करावी लागणार, हे स्पष्ट आहे. यावेळी तूरडाळीचे दर काही प्रमाणात कमी आहे. मात्र मूग डाळीने दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. घाऊक बाजारामध्ये तूरडाळ 70 ते 90 रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात ती 80 ते 100 रुपये किलो आहे. तर मूगडाळ मात्र घाऊक बाजारात 85 ते 100 रुपये किलो एवढी झाली आहे. किरकोळ बाजारात मूगडाळ 110 ते 120 रुपये किलो एवढी आहे. अख्खे मूगही घाऊक बाजारामध्ये 80 ते 100 रुपये आहेत. तर किरकोळ बाजारात 90 ते 110 रुपये किलो झाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies