जोगेंद्र कवाडे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्या, ठाणे जिल्हाध्यक्षांची मागणी

काँग्रेससोबत पीआरपीची आघाडी गेल्या 25 वर्षांपासुन आहे.

ठाणे | नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कवाडे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. निवडणुकीत महाआघाडीमध्ये सहभागी असलेल्या पीआरपी या पक्षाला सत्तेत वाटा मिळावा अशी मागणी तमाम आंबेडकरी जनतेची आहे. परंतु या महाविकास आघाडीच्या दुजाभाव वागणुकीमुळे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना मंत्रीपद मिळणे कठीण वाटत आहे. तेव्हा या महाविकास आघाडीने प्राध्यापक कवाडे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यावे अशी मागणी उल्हासनगर पीआरपीचे नगरसेवक प्रमोद टाले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

काँग्रेससोबत पीआरपीची आघाडी गेल्या 25 वर्षांपासुन आहे. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे काँग्रेससोबत राहुन त्यांनी प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी यांना मनापासुन मदत केली आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही कवाडे यांनी एकत्र राहुन काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणले आहे. दरम्यान सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यावर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सहा मंत्र्यांचा शपथविधी देखिल झाला आहे. मात्र प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनाही महाविकास आघाडी मंत्रीपद देण्यास अनुकूल वाटत नाही. तेव्हा उल्हासनगरातीलच नव्हे तर संपुर्ण राज्यातील आंबेडकरी जनतेची मागणी आहे की, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना कॅबिनेट मंत्रीपदी घ्यावे. अशी मागणी गटनेता प्रमोद टाले व उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष पंडीतभाऊ निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies