CoronaVirus: मुंबईत प्रभादेवी भागात महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह

प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत असल्यांची माहिती समोर आली आहे.

मुंबई | महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत असल्यांची माहिती समोर आली आहे.

या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधलं जात आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. चाचण्या करण्यासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाही. महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आता राज्यातील रुग्णांचा आकडा 124 वर गेला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये पुण्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.AM News Developed by Kalavati Technologies