अवघ्या आठ वर्षीच्या पूजाने फक्त 34 मिनिटात केला रायगड सर

या चिमुरडीने केवळ 34 मिनटात रायगड किल्ला सर करून "हम भी किसींसे कम नही" हे सिद्ध करून दाखवले आहे

रायगड ।  महाड मधील चांभारखिंड येथे राहणाऱ्या दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आठवर्षीय पूजा तुकाराम सावंत हिने अवघ्या 34 मिनिटात रायगड किल्ला सर केला. एव्हढ्या लहान वयात सर केल्याने गडारोहण स्पर्धेत आकर्षण ठरल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यातच नव्हे तर सोशल मीडियावर तिचे कौतुक केले जात आहे.

स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड पाय वाटेने चढवून पाहण्याची इच्छा सर्वांची असते. मात्र सुमारे 10 हेक्टरमध्ये पसरलेला रायगड किल्ला आणि 1640 पायऱ्या डोळ्यासमोर आल्या की अनेकांचे अवसान गळते. मात्र, महाड मधील पूजा सावंत या चिमुरडीने केवळ 34 मिनटात रायगड किल्ला सर करून "हम भी किसींसे कम नही" हे सिद्ध करून दाखवले आहेAM News Developed by Kalavati Technologies