अरे शेती करणार ठीक आहे, पण धरणात पाणी नसले तर काय करणार, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खोचक टोला

माझा शेतकरी पाणी मागायला आला तेव्हा तुम्ही त्याला उदाहरण काय दिलं? आठवा...- उद्धव ठाकरे

मुंबई । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळव्यात उध्दव ठाकरे संबोधित करताना उध्दव ठाकरे अजित पवारांवर बरसले, आजपर्यंत मगरीच्या डोळ्यांतले अश्रू ऐकले होते, पण परवा अजित पवारांच्या डोळ्यांतले अश्रू पाहिल्यानंतर नक्राश्रू काय असतात हे कळले. डोळ्यांत पाणी आणत म्हणाले, राजकारण करणार नाही, शेती करणार. अरे शेती करणार ठीक आहे, पण धरणात पाणी नसले तर काय करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच एकच हशा पिकला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, माझा शेतकरी डोळ्यांत पाणी घेऊन आला होता तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? आज त्या कर्मानेच तुमच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. जे शिवसेनेशी जसे वागले ते तसेच्या तसे संपले. त्याच शिवसेनेच्या शस्त्राने तुम्हाला संपवलेय असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

तुम्ही शेती करणार म्हणालात, पाणी हवं असेल आणि पाणी संपल्यावर धरणापाशी गेलात आणि धरणात पाणी नसेल तर काय करणार? अजित पवार तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हे तुमच्या कर्माने आलेलं आहे. तुमच्याकडे जेव्हा माझा शेतकरी पाणी मागायला आला तेव्हा तुम्ही त्याला उदाहरण काय दिलं? आठवा. काय बोलला होतात ते विसरु नका.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies