उदयनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवर, आजच्या मेगाभरतीत प्रवेश नाही

मंगळवारी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली.

मुंबई | साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात या चर्चा सुरू आहेत. उदयनराजे भाजपच्या बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या मेगाभरतीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय गोटात रंगत होत्या. मात्र आता त्यांचा प्रवेश हा लांबणीवर पडला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. अटी व शर्थी मान्य न झाल्याने त्यांचा प्रवेश बारगळला आहे.

मंगळवारी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली. मात्र या बैठकीमध्ये अटी आणि शर्थी पूर्ण न झाल्यामुळे राजेंचा भाजप प्रवेश हा लांबला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश न करण्याचा निर्णय समोर आला होता. मात्र नंतर त्यांनी पुन्हा यू-टर्न घेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एका ते भाजपमध्ये दाखल होणार याच चर्चांना उधाण आले होते. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चर्चा फिसकटली आणि राजेंना भाजप प्रवेश लांबणींवर गेला आहे.

उदयनराजे भोसले यांनी ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले. मात्र, त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी भेट घेतल्याचे सांगण्यात आले होते. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज यात्रेत स्टार प्रचारक म्हणून निवडण्यात आले होते. पण या यात्रे राजेंनी कोणत्याच टप्प्यात भाग घेतला नव्हता. ही यात्रा साताऱ्यात असतानाही राजेंनी त्याकडे पाठ फिरवली होती. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना दुजोरा मिळाला होता.AM News Developed by Kalavati Technologies