घरात घुसून तरुणावर झाडल्या गोळ्या, मुंबईतील ओशिवरा परिसरातील घटना

पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुंबई | ओशिवारा परिसरात घरात घुसून एकाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. नर्मदा बिल्डिंगच्या फ्लॅट नंबर 311 मध्ये ही घटना घडली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओशिवारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार हत्या झालेल्या तरुणाचे नाव विकी श्रीनिवास गांजी (33) असे आहे. सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास आरोपी त्याच्यावर गोळी झाडून फरार झाला. सोसायटीमधील लोकांनी तात्काळ त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर ओशिवारा पोलिसांसोबत क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळावर तपास करत आहे. पोलिसांनी सोसायटीच्या आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपास करत आहेत. तसेच आजुबाजूच्या लोकांना विचारपूस केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies