मुंबई | दुचाकी स्वाराने पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातली गाडी, रुग्णालयात उपचार सुरू

नालासोपाऱ्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू

 मुंबई | नालासोपाऱ्यात एका दुचाकी स्वाराने पोलीस उपनिरीक्षकावर गाडी घातल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारने जारी केलेल्या कर्फ्युमध्ये नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार रोड वाकण पाडा येथे नाकाबंदी करीत असताना एक मोटारसायकल स्वार वेगाने येत असता त्याला पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील यांनी गाडी थांबवण्यासाठी सांगितली. मात्र त्याने त्यांच्या अंगावर गाडी घातली आणि पाटील यांना डोक्याला, हाताला जबर मार बसला असून नालासोपाऱ्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies