पुलाच्या कामाच्या श्रेयावरून मनसे-सेना आमने-सामने

सक्षम विरोधी पक्ष असल्यास सत्ताधा-यांना पळावे लागेल, मनसे आमदार राजू पाटील यांचा शिवसेनेला टोला

ठाणे । कोपर रेल्वे उड्डाणपूलाचे डिझाईन रेल्वेने मंजूर केले असून पूलाच्या दुरुस्तीचे काम येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. शिवसेनेने या कामाचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे याना दिले आहे. मात्र मनसेच्या पुढाकाराने या ब्रिज काम सुरू होणार असल्याचे दावा मनसेने केल्याने पूलाच्या कामाच्या श्रेयावरुन मनसे-शिवसेना आमने सामने आली आहे.

डोंबिवली पूर्व पश्चीमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्याने हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने पूलाचे दुरुस्तीच्या कामाचे डिझाईन रेल्वेला पाठविले होते. अनेक दिवस उलटून देखील रेल्वेकडून यासंदर्भात निर्णय घेतला गेला नाही. पूलाचे काम व्हावे यासाठी भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्र व्यवहार आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे अधिका:यांसोबत बैठक घेतली. पूलाचे डिझाईन मंजूर करण्याची मागणी राजू पाटील यांनी देखील केली होती. आणि त्यानंतर रेल्वेने येत्या दोन दिवसात मंजूरी देण्याचे माणसे समोर मान्य केले होते. आत्ता रेल्वेने पूलाचे डिझाईनचे मंजूर केले आहे आता या पुलाचे टेंडर निघून मग कामाला सुरुवात होणार आहे. पूलाच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार यावरुन शिवसेना मनसेत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी या कामाचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले आहे. खासदारांच्या पुढाकाराने पूलाचे काम सुरु होणार आहे. असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे म्हणणे आहे की, खासदारांनी प्रयत्न केले असतील. मात्र त्यांचे प्रयत्न दिसून आले नाही. तेव्हाच मनसेला पुढाकार घ्यावा लागला. काम होणे महत्वाचे आहे. विरोधी पक्ष सक्षम असल्यास सत्ताधीकाऱ्यांना कसे पळावे लागणार आता लोक पाहतीलच असा टोलाही पाटील यांनी शिवसेनाला लगावला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूका येत्या वर्षभरात होणार आहे. प्रकल्पाच्या कामसाठी होणा-या श्रेयवादाच्या लढाईमुळे महापालिका निवडणूकीच्या आधीच राजकीय वातावरण तापणार आहे हेच यातून उघड होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies