राजस्थानहून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अंमली पदार्थांची तस्करी करणारे राजस्थान येथील त्रिकुट गजाआड

कल्याण डोंबिवली | राजस्थानहून अफीम घेऊन कल्याणात तस्करीसाठी आलेल्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. या तिघांकडून पाच लाख रुपये किमतीच्या अफीम जप्त केले आहे. भिवंडीत राहणारा सुरेश कुमहार जो दिवसा किराणा स्टोरमध्ये काम आणि रात्री अफीमची तस्करी करत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी बाजारपेठ पोलिसांनी कल्याण दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात सापळा रचला. यावेळी तिघेजण दुचाकीने या परिसरात आले होते.

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ या त्रिकूटवर झडप घातली व या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांकडून पोलिसांनी एक किलो 46 ग्रॅम वजनाचे पाच लाख रुपये किमतीच्या अफीम जप्त केले. सुरेश कुमहार, सोमाराम प्रजापती, भरत चौधरी असे या तिघा आरोपीचे नावे असून त्यानी राजस्थान येथून हे अफिम आणले असून 500 रुपये प्रतिग्रॅम दराने विक्री करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले आहे. AM News Developed by Kalavati Technologies