कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार

कल्याण डोंबिवलीत गेल्या 24 तासात 303 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

ठाणे | कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 303 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत 11 जणांचा मृत्युही झाला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20 हजार 270 इतकी झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 368 जण मृत्युमुखी पडले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 417 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत 14 हजार 257 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीला 5 हजार 645 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies