गाईचे शेण आणि मातीपासून बनवल्या गणेशमूर्ती, डोंबिवलीत विक्रीसाठी आलेत हटके इकोफ्रेंडली बाप्पा

पूजेसाठी ब्राह्मणसहित पूजेचे साहित्यही उपलब्ध

कल्याण डोंबिवली | कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे यंदा राज्य सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळ आणी अनेक नागरिकांचा आपापल्या घरगुती मूर्ती लहान ठेवण्याकडे कल दिसत आहे. तर इकोफ्रेंडली मूर्तीचं घरच्या घरीच विसर्जन करता यावे यासाठी डोंबिवलीच्या एका कारखानदारानी गाईचे शेण आणि मातीपासून गणेशमुर्ती बनवल्या आहेत. मुरबाड, कर्जत, याठिकाणी आदिवासी वस्त्या आहेत लॉकडाऊनच्या काळात महिलांना काम नसल्याने आकाश ठोबरे यांनी त्यांच्याकडून गणपती मूर्ती बनवून बाजारात विक्रीसाठी आणल्या आहेत.

गायीचे शेण आणि मातीपासून बनवलेल्या या इकोफ्रेंडली गणपती बनवण्यासाठी अनेकांच्या हाताला काम लाभले आहे. तसेच यामुळे निसर्गाचीदेखील कोणतीही हानी होणार नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे. त्याचबरोबर गणपतीच्या मूर्ती बुक केल्यास पूजेसाठी भटजी बुवाही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. किंवा ऑनलाईन पूजाही करून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात साहित्य घेण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून पूजेचे सर्व साहित्य देखील याचठिकाणी मिळणार असल्याचे आकाश ठोबरे यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies