पुण्यतिथी विशेष..! स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार

स्वामी विवेकानंद यांनी अमेरिका आणि युरोप मध्ये वेंदात दर्शनाचा प्रचार आणि प्रसार केला. शिकोगातील त्यांच भाषण हे जगप्रसिद्ध आहे.

औरंगाबाद | स्वामी विवेकानंद यांनी अमेरिका आणि युरोप मध्ये वेंदात दर्शनाचा प्रचार आणि प्रसार केला. शिकोगातील त्यांच भाषण हे जगप्रसिद्ध आहे. या माध्यमातून स्वामीजींनी भारतीय अध्यात्मिक संस्कृतीला महत्त्व प्राप्त करून दिले. आपले गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्या नावावरुन स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना केली. जे आज सामाजिक कार्यात महत्वपुर्ण योगदान देत आहे.

- उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय थांबु
नका.

- ब्रम्हांड मधील सर्व शक्ती आपल्या आहेत. पण
आपल्या डोळ्यासमोर हात ठेवतो. आणि किती अंधार
आहे म्हणुन रडत बसतो.


- कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला मदतीचा हात
पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नाहीतर
हात जोडा. आपल्या भावांना आशिर्वाद द्या. आणि
त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.

- पैसाचा उपयोग कुणाला मदत करण्यासाठी वापरला
तर त्याला काही अर्थ आहे. नाहीतर पैसा हा एक
वाईट गोष्टीचा ढीग आहे. त्यातुन जेवढ्या लवकर
सुटका होईल तेवढ चांगले.

- जो व्यक्ती संसारातील गोष्टीमुळे व्याकुळ होत नाही.
त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केल आहे.

- विश्व हे एक व्यायामशाळा आहे. आणि आपण इथे
स्वतः ला मजबुत बनवण्यासाठी आलो आहे.


- बाह्य स्वभाव हे केवळ अंतर्गत स्वभावाच एक मोठ
रुप आहे.- एक कल्पना घ्या. त्या कल्पनेला आपल जीवन
बनवा. त्याविषयी विचार करा, त्याचे स्वप्न बघा. मेंदु,
मांसपेशी, नसा. शरीराच्या प्रत्येक भागात ती कलपना
सामावुन घ्या. बाकीच्या विचारांना बाजुला ठेवा. हीच
यशस्वी होण्याची पध्दत आहे.

- जेव्हा एखादी कल्पना स्पष्टपणे मेंदवर अधिकार
गाजवते. तेव्हा ती मानसिक आणि भौतिक अवस्था
मध्ये परावर्तित होते.

- देवाला आपण कुठे शोधणार? जर आपल्याला देव
स्वतः च्या ह्रदयात आणि जिवंत प्राण्यात दिसत
नसेल.AM News Developed by Kalavati Technologies