महाराष्ट्रात आज 2345 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, दिवसभरात 1408 जण कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात कोरोनाची लागण झालेले 64 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहे.

मुंबई | महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोनाचे 2 हजार 345 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 41 हजार 642 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनाची लागण झालेले 64 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची बाधा होऊन मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 454 वर गेली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांपैकी एकट्या मुंबईत 22 हजार 500 इतके कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. तसेच आज दिवसभरात 1408 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर 11 हजार 726 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.

दरम्यान आज राज्यात ज्या 64 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये 36 पुरूष आणि 28 महिलांचा समावेश होता. या मृत्यूपैकी 60 किंवा त्यावरील अधिक वयाचे 31 रुग्ण होते. तर 40 ते 59 या वयोगटातले होते 29 रुग्ण होते. आणि 4 रुग्ण 40 वर्षापेक्षा कमी वय होते. मृत झालेले रुग्ण मुंबईत 41, मालेगावात 9, पुण्यात 7, औरंगाबादमध्ये 3, नवी मुंबईत 2, तर पिंपरी चिंचवड आणि सोलापूरमधील प्रत्येकी 1 - 1 रुग्ण आहेत.AM News Developed by Kalavati Technologies