आरेला हात लावाल तर याद राखा, आदित्य ठाकरे आक्रमक

व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या बदलीची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे

मुंबई । आरेमध्ये होत असलेल्या प्रस्थावित मेट्रो प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध दर्शविला आहे. आज आदित्य ठाकरे यांनी मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची बदलीची देखील मागणी केली आहे.

आरेमध्ये होणारे प्रस्तावित मेट्रोच्या कारशेडला शिवसेना तीव्र विरोध केलाय. आमचा मेट्रोला नाहीतर आरेमध्ये होत असलेल्या मेट्रोच्या कारशेडला विरोध आहे असे मत शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. आरेमध्ये फक्त जंगलच नाही तर अनेक वन्य जीवांची हानी होणार आहे. याला जबाबदार कोण असेल वन्य जीवांना पण माहुलमध्ये शिफ्ट करणार का असा खोचक प्रश्न देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे आरेमध्येच मेट्रोचे कारशेड व्हावे अन्यथा मेट्रो 3 होणार नाही असे म्हणणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या बदलीची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मेट्रो-3 च्या कारशेडच्या उभारणीवरुन सध्या मुंबईतील वातावरण तापले आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील 2,646 झाडे हटवावी लागणार आहेत. त्यास वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली असली तरी शिवसेना याला सुरवातीपासून विरोध दर्शवित आहे. मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारणे सर्वाधिक सोयीचे आहे. ही कारशेड अन्यत्र हलवावी लागली तर, हा प्रकल्पच पूर्ण होऊ शकणार नाही,’ असे मत मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले होते त्यावर आदित्य ठाकरे यांनी ही मुंबईकरांना आणि हायकोर्टाला ही धमकी आहे असे मत व्यक्त केले आहे. अश्या अधिकाऱ्यांपेक्षा मुंबईकरांची काळजी असलेले अधिकारी नियुक्त करावे अशी मागणी देखील आदित्य यांनी केली आहे. आरेला हात लावला तर शिवसेना सहन करणार नाही,” असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.AM News Developed by Kalavati Technologies