राज्यात लवकरच होणार पोलीस भरती - गृहमंत्री अनिल देशमुख

सोमवारी अमरावती जिल्यातील दर्यापूर येथे एका कार्यक्रमात प्रसंगी ते बोलत होते.

मुंबई | गृहखात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सात ते आठ हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे सांगितले. सोमवारी अमरावती जिल्यातील दर्यापूर येथे एका कार्यक्रमात प्रसंगी ते बोलत होते.

गृह मंत्री देशमुख म्हणाले की, पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच अवैध सावकारी, नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी शासन महत्त्वाची पावले उचलणार असल्याचेही देशमुखांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies