'एमएसपी होता, एमएसपी आहे आणि तो भविष्यातही राहणार', पंतप्रधानांचे संसदेत आश्वासन

कृषी कायद्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले भाष्य केले असून, त्यांनी एमएसपी बाबत शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे

नवी दिल्ली । यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत कृषी कायद्यांवर आपले भाष्य केले आहे. पिकांना एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत कायम राहील. अशी खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी संसदेत बोलताना दिली.

नव्या कृषी कायद्यांमुळे पिकांना हमीभाव मिळणार की, नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडल आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हमी भाव कायम राहतील? असे संसदेत आश्वासन दिले. तसचे त्यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांनाही चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे.'एमएसपी होता, एमएसपी आहे आणि तो भविष्यातही राहिल. गरिबांना परवडणाऱ्या दरात धान्य उपलब्ध करून दिले जाईल. मंडीचे आधुनिकीकरण केले जाईल. आपले कृषीमंत्री हे शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत बोलत आहेत. चिंतेची स्थिती नाही. या सभागृहाच्या माध्यमातून मी पुन्हा त्यांना चर्चेसाठी निमंत्रित करतो. पण मुद्दा सोडवण्यासाठी पाऊल पुढे टाकले पाहिजे' असे राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर मोदी म्हणाले.

कृषी कायद्याविरोधात विरोधी पक्ष काँग्रेस आंदोलनामध्ये सहभागी होत असून, त्याबद्दल काहीही आक्षेप आम्हाला नाही. काँग्रेसने शेतकऱ्यांनाही मागील अनेक वर्षांपासून असणारी यंत्रणा आता बदलण्याची गरज आहे. हे ही सांगणं महत्वाचं होतं. असे प्रतिपादन मोदी यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies