'महाराष्ट्र केसरी' किताब पटकाविल्याबद्दल हर्षवर्धन सदगीर यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

हर्षवर्धन सदगीरनं 'महाराष्ट्र केसरी'च्या मानाच्या गदेसह भेट घेऊन आपल्या यशाची माहिती दिली

मुंबई । कुस्तीतील 'महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकाविल्याबद्दल कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. हर्षवर्धनच्या पाठीवर शाबासकीची थाप ठोकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्याचे कौतुक केले. कुस्तीपटु हर्षवर्धनने आज मंत्रालयात मुख्यमंत्री ठाकरे यांची 'महाराष्ट्र केसरी'च्या मानाच्या गदेसह भेट घेऊन आपल्या यशाची माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कॉर्पोरेशनतर्फे घेण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर विजेता ठरला. पुण्यातील बालेवाडीत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात झालेल्या लढतीत हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळके याच्यासोबत झालेल्या लढतीत विजय मिळवला.AM News Developed by Kalavati Technologies