औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी! औरंगाबादमध्ये 'कोव्हिशिल्ड' लस दाखल

आज औरंगाबादमध्ये कोव्हिशिल्ड लसीचे 66 हजार डोस दाखल झाले आहे

औरंगाबाद । भारतात येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरूवात होत असून, मंगळवारी पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटमधून 'कोव्हिशिल्ड' लसीचा पुरवठा देशातील विविध भागात पाठवण्यात आला. कोरोना बहुप्रतिक्षित लसीचा पहिला साठा औरंगाबादमध्ये आज दाखल झाला. लसीचे 66 हजार डोस औरंगाबादमध्ये पाठवण्यात आले आहे. आरोग्य प्रशिक्षण केंद्रामध्ये या लसीचा साठा ठेवण्यात आला आहे. 16 जानेवारीला लसीकरणास सुरूवात होणार असून, त्यापार्श्वभुमीवर ही लस जिल्ह्याभरात पाठवली जाणार आहे. जिल्ह्यात कोरोनाची लस दाखल झाल्याने कोरोना लसीबाबत औरंगाबादकरांची प्रतिक्षा संपली आहे. दरम्यान सीरमची कोव्हिशिल्ड ही लस राज्यातील 26 ठिकाणी पोहोचणार आहे. आज सकाळी मुंबईत सुद्धा 1 लाख 39 हजार 500 कोरोनाचे डोस सीरमकडून देण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies