Farmers Protest : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत 'कृषी कायद्यांवर' भाष्य करणार

पंतप्रधान मोदी आज राज्यसभेत कृषी कायद्यांवरून भाष्य करणार आहे. त्या पार्श्वभुमीवर बीजेपी आणि काँग्रेसने आपल्या सदस्यांना व्हिप जारी केलं आहे

नवी दिल्ली । प्रंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा करू शकतात. यासंबंधी पार्टीने व्हीप काढला आहे. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी भाजपला मोठ्या प्रमाणात घेरलं आहे. त्यामुळे आता सर्वाचे लक्ष पंतप्रधान मोदी या मुद्यावर काय भाष्य करतात याकडे लागले आहे. तर तिकडे विरोधी पक्ष काँग्रेसनेही आपल्या सर्व सदस्यांना व्हीप जारी केलं असून, राज्यसभा स्थगित होईपर्यंत थांबण्याचे आदेश देण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने आज पीएम मोदी संसदेत आपले भाष्य करणार असल्याचं ट्विट केलं आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात संसदेत आवाज उठवला आहे. तसेच शेतकरी आंदोलनालाही पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्ष सरकारने हे कायदे तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी करत आहे. अर्थसंकल्पीय सत्रादरम्यान विरोधी पक्षाने कृषी कायद्यांना मागे घेण्याची मागणी केली होती. व केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात हल्लाबोल केला होता.

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आतापर्यंत 11 वेळा बैठका पार पडल्या असून, त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. सरकार हे कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्यास तयार असून, शेतकरी मात्र आपल्या मागणीवर ठाम असून, जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असा ईशारा त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies