लॉकडाऊन असताना घराबाहेर पडल्याचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

लॉकडाऊन असताना ही घराबाहेर पडल्याचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

मुंबई | कांदिवलीत मोठा भाऊ आणि वहिनी घराबाहेर गेल्यावरून दोन भावांमध्ये वाद झाला. लहान भाऊ उलट बोलल्याचा रागातून मोठ्या भावाने त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुर्गेश ठाकूर (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली आहे. राजेश ठाकूर (वय 28) वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कांदिवलीच्या समतानगर परिसरातील पशुपतीनाथ दुबे चाळीत दुर्गेश त्याचा मोठाभाऊ आणि वहिनीसोबत रहात होता. देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमिवर सरकारने संचारबंदीचे आदेश जारी करत, सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. तसेच नियमांचे उल्लघंन करू घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केली आहे.

लॉकडाऊन असल्यामुळे दुर्गेशने मोठ्या भाऊ राजेश आणि त्याची पत्नीला घराबाहेर न पडण्यास सांगितले होते. मात्र घरातील भाजीपाला संपला असल्याने मोठ्या भाऊ राजेश आणि वहिनी घराबाहेर भाजीपाला घ्यायला गेले. घरी परत आल्यावर लॉकडाऊन असताना तुम्ही दोघे बाहेर का गेला होता? अशी विचारणा लहान भावाने केली. त्यावर 'तू आम्हाला शिकवू नकोस, काय करायचे आहे ते आम्हाला चांगले माहीत आहे,' असं बोलून मोठा भाऊ लहान भावाशी वाद घालू लागला, हा वाद इतका वाडत गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यावेळी रागात झालेल्या मोठ्या भावाने दुर्गेशच्या डोक्यात लोखंडी तवा मारला. या मारहाणीत दुर्गेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात नेले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुर्गेशच्या हत्येप्रकरणी समतानगर पोलिसांनी मोठ्या भाव राजेश ठाकूर 28वर्ष विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies