झोंबिवली की डोंबिवली?; चित्रपटाच्या नावावरून वाद, मनसे आक्रमक

मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केली विरोधात फेसबुक पोस्ट, नाव बदलण्याची केली विनंती

ठाणे | डोंबिवली नावावरून चित्रपट येऊन गेला आणि तो सुपरहिट सुद्धा झाला होता. तेव्हा डोंबिवलीकरानी सुद्धा चित्रपटाला उचलून धरले होते. मात्र काल 'झोंबिवली' या चित्रपटाचे पोस्टर सर्व ठिकाणी व्हायऱल झाले आणि नावावरून वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी चित्रपटाच्या नावाला विरोध करत, विरोधात फेसबुक पोस्ट केली आहे. "प्रसिद्धीकरिता काहीही करू नका, प्रत्येक गावाचा शहराचा सन्मान राखला गेलाच पाहिजे माझ्या डोंबिवलीचे कोणी ही यावे आणि वाभाडे काढावे हे मी तरी खपवून घेणार नाही, माझ्या शहराचा अपमान हा माझा अपमान असं मी समजतो" अशी फेसबुक पोस्ट केली आहे.

तसेच आमच्या शहरात नागरी समस्या, त्या तर सर्वच ठिकाणी आहेत. आम्ही आमच्यात बघुन घेवू, आमच्या डोंबिवलीच्या संस्कृतीचे जगाने अनुकरण केले, कुठलेही क्षेत्र नाही किंवा जगाच्या पाठीवर असा कुठलाही कोपरा नाही जिथे माझा डोंबिवलीकर भेटणार नाही, सुशिक्षित,सुसंस्कृतांची ही पंढरी आहे,डोंबिवली हे कलेचे, कलाकारांचे माहेर घर आहे अश्या ह्या माझ्या शहराची बदनामी करू नका, माझ्या शहराला कोणी काही चांगले देवू शकत नसेल तर त्याबद्दल वाईट तरी पसरवू नका. कृपया चित्रपटाचे नाव बदला अशी विनंती मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies