सीएसएमटी पनवेल लोकलच्या पेंटाग्राफला वाशी स्टेशनवर आग, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

सीएसएमटी-पनवेल लोकल सकाळी 9.23 वाजता वाशी स्थानकात येताच पेंटाग्राफला आग लागली.

नवी मुंबई | सीएसएमटी पनवेल लोकलच्या पेंटाग्राफला वाशी स्टेशनवर आग लागली. यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ऐन गर्दीच्या वेळेत हार्बर मार्गावरील वाशी स्थानकात ही घटना घडली. या आगीमुळे स्थानकातील प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. सीएसएमटी-पनवेल लोकल सकाळी 9.23 वाजता वाशी स्थानकात येताच पेंटाग्राफला आग लागली.

या घटनेनंतर लोकल कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. यामुळे पनवेल दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. तसेच सकाळी ऐन गर्दीच्या वेळी घटना घडल्यामुळे प्रवाशांनाही कार्यालयात पोहचण्यास उशीर हार्बर मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशीराने धावत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies