रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकल सेवेत सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा, व्हिडिओ व्हायरल

लोकलमध्ये प्रवास करतांना कोणतेही सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचं पालन केलं जात नसल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे | रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दररोज ये जा करण्यासाठी काही दिवसांपासून मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र या लोकलमध्ये प्रवास करतांना कोणतेही सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचं पालन केलं जात नसल्याची माहिती समोर आली आहे. लोकलमध्ये प्रवास करतांनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये रेल्वे वर्करने मास्क लावला आहे पण सोशल डिस्टन्सिंग मात्र ठेवलेले नाही. या व्हिडिओमुळं कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. सुमारे दोन महिन्यांनी शुक्रवारी सकाळी कसारा सीएसएमटी , कर्जत सीएसएमटी आणि कल्याण सीएसएमटी मार्गावर रेल्वे वर्करसाठी विशेष लोकल सोडण्यात आली. मात्र त्या लोकलमध्ये सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कल्याण स्थानकातून सुटणारी पहिली लोकल ही सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी ठाकुर्ली स्थानकात आली, तसेच कर्जत येथून सुटलेली लोकल ठाकुर्ली मध्ये सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास आल्याचे सांगण्यात आले. एका लोकलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये रेल्वे वर्करने मास्क लावला आहे पण सोशल डिस्टन्सिंग मात्र ठेवलेले नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांबद्दल चर्चा सुरू आहे. प्रवासी एकमेकांजवळ उभे होते, एकमेकांजवळ बसले होते असे चित्र व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे.AM News Developed by Kalavati Technologies