Corona Update: औरंगाबादेत गेल्या 24 तासात 406 जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा 29 हजारांच्या पार

जिल्ह्यात सध्या 5 हजार 962 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 824 जणांचा मृत्यू झाला आहे

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या 24 पुन्हा 406 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 29 हजार 208 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 5 हजार 962 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 824 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 22 हजार 422 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 55, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 127 आणि ग्रामीण भागात 93 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (139)

नवीन कायगाव (1), शहापूर (1), वडगाव कोल्हाटी (1), रांजणगाव (1), बजाज नगर (1), सिडको महानगर (2), लोणी खुर्द, वैजापूर (1), खंडोबा मंदिराजवळ लांझी (1), नेहरू नगर, रांजणगाव (1), माळी गल्ली, रांजणगाव (1), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (2), शिवशंकर कॉलनी, रांजणगाव (1), कमलापूर फाटा, रांजणगाव (1), लिलासेन, रांजणगाव (1), न्यू वाडगाव, गंगापूर (2), दहेगाव बंगला, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (3), लासूर, गंगापूर (1), मांजरी, गंगापूर (1), बोळेगाव, गंगापूर (2), पिंपळवाडी, गंगापूर (1), नवीन बसस्टँड, गंगापूर (4), जयसिंगनगर, गंगापूर (2), श्रीराम नगर, वडगाव को. (1), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (1), प्राथमिक आरोग्य केंद्र, निलजगाव (3), सरस्वती कॉलनी, कन्नड (1), म्हाडा कॉलनी, कन्नड (1), नेवरगाव, गंगापूर (2), चित्तेपिंपळगाव (1), साजापूर (1), चित्तेगाव (1) औरंगाबाद (28), फुलंब्री (3), गंगापूर (22), कन्नड (9), खुलताबाद (5), वैजापूर (14), पैठण (13)

मनपा (85)

श्री हाऊसिंग सो. (2), लक्ष्मी कॉलनी (1), मयूर पार्क (1), म्हाडा कॉलनी (1), मोती कारंजा (1), एन अकरा सिडको (1), वेदांत नगर (3), सातारा परिसर (1), अन्य (6), गुरूदत्त नगर (1),बालाजी नगर (2), महेश नगर (1), गुलमोहर कॉलनी (1), मल्हार चौक, गारखेडा (1), देवळाई बीड बायपास (2), एन सात श्रेय नगर (1), भारत माता कॉलनी (3), टाऊन सेंटर (1), श्रीकृष्ण नगर (2) जाफर गेट (1), शिल्प नगरी, बीड बायपास (1), दिशा नगरी, बीड बायपास (1), जाधवमंडी (1), एसबीएच कॉलनी (1), छावणी (2), उस्मानपुरा (1), एन सहा साई नगर (2), गारखेडा परिसर (1), अदालत रोड, भाग्य नगर (1), ब्ल्यू बेल, चिकलठाणा (1), देवगिरी कॉलनी, क्रांती चौक (1), पडेगाव (1), रामचंद्र हॉल, बीड बायपास (1), शंभू नगर चौक, कासलीवाल पूरम इमारत (2), सेव्हन हिल (1), रोज गार्डन (1), सिडको बसस्टँड (1), गजानन नगर (2), कडा कॉलनी (1), विष्णू नगर (1), केतकी अपार्टमेंट, गारखेडा परिसर (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), स्वामी विवेकानंद नगर, हडको (1), जटवाडा, हर्सूल (1), एन चार सिडको (1), धूत हॉस्पीटल परिसर (1), म्हसोबा नगर, हर्सुल (2), शिवाजी नगर (1), गजानन नगर,उस्मानपुरा (1), सुंदरवाडी (1), खिंवसरा पार्क, उल्कानगरी (1), एम दोन टीव्ही सेंटर (1), कासलीवाल पूर्वा, चिकलठाणा (2), बीड बायपास (1), आरती नगर (1), हनुमान नगर (1), समर्थ नगर (1), शासकीय दंत महाविद्यालय परिसर (1), एन आठ सिडको (2),उल्कानगरी (4), भानुदास नगर (1), भगवती कॉलनी, गारखेडा परिसर (1)

सिटी एंट्री पॉइंट (55)

हर्सुल सावंगी (1), एन एक सिडको (3), बजाज नगर (1), माळीवाडा (1), जटवाडा रोड (5), सिडको (1), एन सहा (1), एन बारा, भारत नगर (2), पिसादेवी (1), म्हसोबा नगर (1), उल्कानगरी (4), मसनतपूर (2), म्हाडा कॉलनी (1), वानखेडे नगर (1), एन सहा, संभाजी कॉलनी (1), शहा बाजार (1), एन तीन सिडको (1), पडेगाव (1), देवळाई चौक (1), कांचनवाडी (1), इटखेडा (3), नक्षत्रवाडी (2), विजय नगर, पैठण रोड (4), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंपाजवळ (1), पद्मपुरा (1), पंढरपूर (1), चित्तेगाव (1), कुंभेफळ (1), सिडको, वाळूज (1), बजाज नगर (1), वडगाव, वाळूज (1), सिडको एन अकरा (2), सहारा, जटवाडा रोड (2), सावंगी (1), न्याय नगर (1), मारोती नगर, मयूर पार्क (1)

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत पैठण तालुक्यातील बाला नगरातील 58 वर्षीय पुरूष, शहरातील रोकडिया हनुमान कॉलनीतील 58 वर्षीय पुरूष, नेवरगाव गंगापुरातील 90 वर्षीय पुरूष, बजाज नगरातील 80 वर्षीय स्त्री, पाचोड, पैठणमधील 65 वर्षीय पुरूष, भक्तीनगरातील 69 वर्षीय पुरूष, नवनाथ नगर, गारखेडा परिसरातील 84 वर्षीय स्त्री, जिल्हा सामान्य रुग्णालयात जाधववाडीतील 50 वर्षीय पुरूष आणि एका खासगी रुग्णालयात चित्तेगावातील 47 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies