राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 112 वर, एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण

सांगली इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना लागण झाली आहे.

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता पुन्हा नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता कोरोना रुग्णांची संख्या 112 वर पोहोचली आहे. नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 6, सांगलीच्या इस्लामपूरमधील 4, पुण्याचे 3, सातारा जिल्ह्यातील 2 तर अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तर सांगली इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना लागण झाली आहे.

सध्या कोरोनाच्या दोन रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर 15 रुग्णांना आज डिस्चार्ज होण्याची शक्यता आहे. यासोबतच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies