कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 588 जणांना कोरोनाची लागण, तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 89 हजारांच्या पार गेला आहेत

नागपूर । नागपूरात कोरोनाचा उद्रेक कायमच आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 588 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 89 हजार 87 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 7 हजार 351 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 2 हजार 892 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 78 हजार 844 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज आढळलेल्या 588 रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 249 तर शहरी भागातील 331 जणांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. अगदी जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागपूरकरांच्या चिंतेच आणखीणच भर पडली आहे.AM News Developed by Kalavati Technologies