कोरोना अपडेट | पालघरमध्ये गेल्या 24 तासात 376 जणांना कोरोनाची लागण; 4 जणांचा मृत्यू

सध्या पालघरमध्ये 3 हजार 647 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे 583 जणांचा मृत्यू

पालघर । पालघरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात 376 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 29 हजार 768 एवढा झाला आहे. सध्या पालघरमध्ये 3 हजार 647 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामु आत्तापर्यंत सुमारे 583 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे 25 हजार 538 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे पालघरकरांच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे.AM News Developed by Kalavati Technologies