Corona Solapur: सोलापूरात आज 547 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 हजारांच्या पुढे

सध्या जिल्ह्यात 6 हजार 835 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे सुमारो 950 जणांचा मृत्यू झाला आहे

सोलापूर । सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आज जिल्ह्यात तब्बल 547 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 13 जणांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 25 हजार 386 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 6 हजार 835 रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत कोरोनामुळे 950 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आत्तापर्यंत सुमारे 17 हजार 601 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, वाढती रुग्णसंख्या हा आता सोलापूरकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.AM News Developed by Kalavati Technologies