पालघर जिल्ह्यात कोरोनाचा कहर, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने, भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

पालघर । पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातशेतीचं मोठे नुकसान झाले आहे. वीजच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे कापणीला आलेले उभे भातपिके आडवे पडले आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी कापून टाकलेल्या भातपिकाची कडपं पाण्यावर तरंगू लागल्याने हाती आलेलं पिक पूर्णपणे भिजून गेल्याने आधीच नुकसानीत असणारा शेतकरी आता अधिक संकटात सापडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे असाच पाऊस सुरु रहिला तर हाताशी आलेलं संपूर्ण भातपिक वाया जाण्याच्या भीतीने पालघरमधील शेतकरी चिंतेत आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies