कोरोना रुग्णाला रुग्णालयात चालत येण्याचा सल्ला; आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

प्रथमच हा प्रकार घडल्याने माहिती घेऊन कारवाई करण्याचे दिले आश्वासन.

कल्याण डोंबिवली | रुग्णवाहिका अभावी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला काल चालत रुग्णालय गाठावे लागले होते. त्यानंतर चालत येणार रुग्ण हा 'ए सिंथटिक' असल्याने त्याला कल्याण भिवंडी रोड वरील टाटा आमंत्रा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. चालत येणारा कोरोनाबधित रुग्ण हा एका रुग्णालयातील कर्मचारी आहे. या घटनेनं परिसरातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केल्या जात होता. दरम्यान  काल घडलेल्या प्रकरणाची आयुक्तांनी दखल घेतली आहे. पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी उपायुक्तांना चौकशीचे आदेश दिले असून या प्रकरणाची माहिती घेऊन उचित कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी आयुक्तांनी सांगतले की, कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 33 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून या सर्व रुग्णवाहिका ट्रेकिंग वर ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकेच्या सुविधांसाठी 3 हेल्पलाईन ठेवण्यात आल्या आहेत. हेल्पलाईन वरून रुग्णाच्या जवळपास असलेल्या रुग्णवाहिकेला रुग्णाजवळ पाठवले जाते. काल घडलेला प्रकार हा पहिल्यांदाच घडला असून याप्रकरणी योग्य चौकशी करून कारवाई केली जाण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.AM News Developed by Kalavati Technologies