काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक, पूरपरिस्थिती संदर्भात चर्चा करणार

ही तातडीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेते पूर प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मुंबई | मुंबईमध्ये मंगळवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीच्या संदर्भात चर्चा या बैठकीमध्ये करण्यात येणार आहे. ही तातडीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेते पूर प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. टिळक भवन येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीच्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. तसेच सध्याच्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.

गेल्या आठवडाभरापासून पश्चिम महाराष्ट्रात महापूराने हाहाकार उडाला आहे. आता पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली उपायोजना यासोबतच त्यात असलेल्या त्रुटी आणि काही बदल करावे याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकता. यासोबतच पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीमध्ये काही चांगल्या सूचना करण्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलं आहे. यासोबतच विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातूनही या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यासह अनेक नेते या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेAM News Developed by Kalavati Technologies