दिलासादायक! देशात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 9 हजार जणांना कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण कमी झाला असून, गेल्या 24 तासात 9,110 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 9 हजार 110 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर 78 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 कोटी 8 लाख 47 हजार 304 एवढा झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 1 लाख 43 हजार 625 जणांवर उपचार सुरु असून, उपचारादरम्यान आतापर्यंत 1 लाख 55 हजार 158 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 1 कोटी 5 लाख 48 हजार 521 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्णाचा रिकव्हरी रेट हा 97.24 टक्के इतका आहे. दरम्यान, देशात कोरोना लसीकरणाला 16 जानेवारी पासून सुरुवात झाली असून, देशात आतापर्यंत 62 लाख 59 हजार 008 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies